तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २७ जून (वार्ता.) – उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील ‘चिन्मय मूर्ती संस्थान’चे मठाधिपती पूजनीय माधवानंद महाराज यांच्या आज्ञेनुसार चिन्मयमूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार आणि नांदेड महापालिका सभागृहनेता अधिवक्ता महेश कनकदंडे यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
अधिवक्ता महेश कनकदंडे आणि सौ. मोहिनी महेश कनकदंडे यांच्या हस्ते २६ जून या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची पूजा झाल्यावर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्री. नागेश शितोळे आणि धार्मिक व्यवस्थापक श्री. मार्तंड दीक्षित यांनी धनादेश स्वीकारला. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने श्री. आणि सौ. कनकदंडे यांचा साडी, श्री तुळजाभवानीदेवीचे चित्र आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पुजारी सर्वश्री रवी पाठक, किरण पाठक, प्रशांत देशमुख, सर्वोत्तम जेवळीकर हे उपस्थित होते.