चिखली (बुलढाणा) – येथे नुकत्याच झालेल्या विवाहानंतर आदर्श पद्धतीने वरात काढण्यात आली. चिखली येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प. जागृती उपाख्य पूजा येवले आणि ह.भ.प. अंकुश सुरडकर या वधू-वराने त्यांच्या विवाहाची वरात ‘डीजे’ किंवा ‘बँडबाजा’ न लावता टाळ-मृदंगाच्या गजरात ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या घोषात पार पाडली. विशेष म्हणजे वराने स्वतःही पखवाज वाजवला. हिंदु धर्मातील सोळा संस्कारांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा विवाहसंस्कार काही प्रमाणात यशस्वी करण्याचे प्रयत्न वधू-वर आणि त्यांचे माता-पिता यांनी केले. चिखली येथील दिनेश देशमुख यांनी ‘अत्यंत प्रसन्न वातावरण निर्माण करणारी, तसेच आयुष्यात कधीही विसरता न येणारी लग्नाची मिरवणूक’ अशा शब्दांत वरातीचे कौतुक केले. या वरातीमुळे उपस्थितांचीही मने प्रसन्न झाली.
संपादकीय भूमिकाबँड किंवा डीजे यांच्याऐवजी टाळ-मृदंगाच्या तालावर वरात काढणारे आदर्श वधू-वर ! |