पाकच्या गृहमंत्र्यांना अमली पदार्थांच्या प्रकरणी समन्स

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांना लाहोर येथील अमली पदार्थांच्या संदर्भातील विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांच्यावर २५ जून या दिवशी आरोपनिश्‍चिती केली जाणार आहे. जुलै २०१९ मध्ये त्यांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. त्यांच्या गाडीमध्ये १५ किलो हेरॉईन सापडले होते. गेल्या १० वर्षांपासून ते अमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांची बँक खाती आधीच गोठवण्यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?