अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात दारू विकण्यावर बंदी !

प्रतिकात्मक छायाचित्र

अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने येथील श्रीराममंदिर परिसरातील सर्व दारूच्या दुकानांची अनुज्ञप्ती (परवाने) रहित केल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) नितीन अग्रवाल यांनी दिली. या परिसरात आता दारूची विक्री करण्यावर बंदी असणार आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर प्रत्येक मंदिराच्या परिसराजवळ दारूविक्रीवर बंदी घातली पाहिजे. संपूर्ण देशातच असा नियम बनवला पाहिजे !