विवेक अग्निहोत्री यांचा ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयातील कार्यक्रम अचानक रहित

विवेक अग्निहोत्री हानीभरपाईसाठी खटला प्रविष्ट करणार

विवेक अग्निहोत्री

नवी देहली – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयात भाषण आयोजित करण्यात आले होते; मात्र या विश्‍वविद्यालयाने ते अचानक रहित केले. यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्डच्या विद्यार्थी संघटनेच्या विरोधात खटला प्रविष्ट करण्याची चेतावणी दिली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटवर एक व्हिडिओद्वारे म्हटले आहेत की,

१. एकाच दिवशीसाठी चुकून दोन बुकिंग झाल्या असून यामुळे दुसरा कार्यक्रम होऊ शकत नाही, असे मला सांगण्यात आले. मला न विचारता १ जुलै या दिवशी भाषण निश्‍चित करण्यात आले होते; कारण त्या दिवशी कुणीही विद्यार्थी नसेल आणि कार्यक्रम करण्याला काही अर्थ रहाणार नाही.

२. आमच्यावर ‘इस्लामोफोबिक’ (इस्लामविषयी द्वेष असलेले) असल्याचा शिक्का मारला जात आहेत. ते काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार नाकारत आहेत आणि हिंदूंना नाकारत आहेत. जणू काही सहस्रो काश्मिरी हिंदूंना मारणे हे ‘हिंदुफोबिक’ (हिंदूंविषयीचा द्वेष) नसून सत्यावर चित्रपट बनवणे म्हणजे ‘इस्लामोफोबिक’ आहे.

३. मी युरोपमध्ये असून माणुसकीच्या दौर्‍यावर आहे. केंब्रिज विश्‍वविद्यालय, ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालय, ब्रिटीश संसद, जर्मनी आणि नेदरलँड येथील अनेक प्रतिष्ठित ठिकाणी मला आमंत्रित केल्यामुळे हा दौरा ठरवण्यात आला. केंब्रिज विश्‍वविद्यालयात पोचलो असता मला शेवटच्या क्षणी ‘आम्ही कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही’, असे सांगण्यात आले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर १०० टक्के आक्रमण आहे. काही पाकिस्तानी आणि काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी याला विरोध करत असल्यामुळे हे घडले. हे नरसंहार नाकारणारे आहेत.

४. मी यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करत असून मला साहाय्य करा. मी सर्व हानीभरपाई मागणार आहे. यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमधील विश्‍वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक ! हिंदूंवरील अत्याचार उघड करणार्‍यांना अशा प्रकारे टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे लक्षात घ्या !