हिंदु संघटनानांकडून आंदोलनानंतर जमावबंदी
चितोडगड (राजस्थान) – येथे ३१ मेच्या रात्री अज्ञतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. यानंतर येथे हिंदु संघटनांकडून येथील चौकात आंदोलन करण्यात आले. काही वेळानंतर येथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी येथे जमावबंदी लागू केली आहे. दुचाकी वाहनांवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या यांद्वारे रत्न सोनी यांच्यावर आक्रमण करून पलायन केले. सोनी यांना घायाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना उदयपूर येथे नेण्यास सांगण्यात आल्यावर वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सोनी बजरंग दलाशी संबंधित होते. त्यांचे वडील माजी नगरसेवक आहेत.
Tension in Rajasthan’s Chittorgarh after murder of RSS functionary, Section 144 clamped#Rajasthan #RSShttps://t.co/pUJ2kKFbba
— India TV (@indiatvnews) June 1, 2022
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदू आणि हिंदूंचे नेते असुरक्षितच असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आवश्यक ! |