अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील श्री वार्ष्णेय महाविद्यालयातील प्राध्यापक एस्.आर्. खालिद यांनी महाविद्यालयाच्या आवारात नमाजपठण केल्याने त्यांना १ मासाच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
A college professor was sent on one month’s compulsory leave after a video showing him perform ‘namaz’ in the college lawns went viral in Aligarh. https://t.co/VNqaMYKFfC
— The New Indian Express (@NewIndianXpress) June 1, 2022
नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता. महाविद्यालयाकडून या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटले की, महाविद्यालय प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतर यावर कारवाई केली जाईल.