प्रसिद्ध गायक के.के. यांचे हृदयविकाराने निधन

डोक्याला आणि चेहरल्याला जखमा झाल्याने गुन्हा नोंद

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.)

कोलकाता – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.) यांचे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. येथे ३१ मे या दिवशी सायंकाळी एक जाहीर कार्यक्रम केल्यानंतर ते हॉटेलमधील त्यांच्या खोलीत गेले असता तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तत्पूर्वीचे त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या डोक्याला आणि चेहर्‍याला काही ठिकाणी जखमा झाल्याने पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू’ अशी नोंद करत शवविच्छेदनाचा निर्णय घेतला. तसेच स्थानिक न्यू मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पोलीस जाहीर कार्यक्रमाचे आयोजक आणि रुग्णालयातील कर्मचारी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. के.के. यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.