ध्येय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज

अधिवेशनामध्ये सोलापूर येथील दैनिक ‘अग्रणी वार्ता’चे संपादक आणि ‘वन्दे मातरम्’ पत्रकार कक्षाचे अध्यक्ष श्री. योगेश तुरेराव यांनी ‘हलाल जिहादसारखे ज्वलंत विषय प्रसार माध्यमे का हाताळत नाहीत ?’ या विषयी संबोधित केले.

देशातील पहिला जनुक कोश प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता !

देशातील पहिलाच महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प राबवण्यास २८ एप्रिल या दिवशी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांना पुण्यातून अटक !

घोटाळा प्रकरणात नेत्यांचा सहभाग चिंताजनक !

आम्हाला धर्मशिक्षित हिंदु राष्ट्र पाहिजे ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन

ओवैसी यांचा मुसलमानांना भडकावण्याचा पुन्हा प्रयत्न : ‘मैदान न सोडण्या’चा सल्ला !

ओवैसी यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराविषयीचे सूत्र सामजिक माध्यमांवर उपस्थित केले, तसेच पोलीस एका विशिष्ट समुदायावर कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. भाजप फुटीर रणनीती अवलंबत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

अती डावे लोक सर्वांचा आणि स्वतःचाही तिरस्कार करतात – एलन मस्क

अती डावे लोक सर्वांचा तिरस्कार करतात. त्यात त्यांचा स्वतःचाही समावेश आहे, असे ट्वीट ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी केले. त्यानंतर अवघ्या १६ मिनिटांनंतर त्यांनी पुन्हा ट्वीट केले.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील विशाल फटे विरुद्ध १ सहस्र ४०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर !

गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे आमीष दाखवून परतावा न देता फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे याच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध बार्शी शहर पोलिसांनी विशेष न्यायालयात १ सहस्र ४०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे.

‘डेसिबल’चा नियम एकाच धर्माला सांगू शकत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एका मुसलमान पत्रकाराने त्याच्या लहान मुलाला भोंग्याचा त्रास होत असल्याचे मौलवीला सांगितले. मुसलमान समाजालाही भोंग्याचा त्रास होतो.

सोलापूर बसस्थानकात बसगाड्यांची कोंडी !

सांगली, लातूर, कोल्हापूर, कोकण, पुणे यांसह कर्नाटक येथे जाणार्‍या बसगाड्या मोठ्या प्रमाणात सोलापूर बसस्थानकातून जातात. याचसमवेत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील तीर्थक्षेत्रांना जाणार्‍या बसगाड्यांची संख्याही अधिक आहे.

मुंबईतील वृत्तपत्रांच्या किमती १ जूनपासून वाढवण्याचा निर्णय !

मुंबईतील वृत्तपत्रांच्या किमती १ जूनपासून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.