सोलापूर, १ मे (वार्ता.) – सांगली, लातूर, कोल्हापूर, कोकण, पुणे यांसह कर्नाटक येथे जाणार्या बसगाड्या मोठ्या प्रमाणात सोलापूर बसस्थानकातून जातात. याचसमवेत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील तीर्थक्षेत्रांना जाणार्या बसगाड्यांची संख्याही अधिक आहे. यामुळे एकाच वेळी अनेक गाड्या सोलापूर बसस्थानकात आल्याने अपुर्या जागेमुळे, तसेच नियोजनाअभावी बसगाड्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. यामुळे ५, १० किंवा १५ मिनिटे अनेक गाड्यांना बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी उभे रहावे लागते. गाड्यांना अनेक काळ फलाटही रिकामा मिळत नाही. यामुळे प्रवाशांचा वेळही जातो, तसेच गोंधळाची स्थिती निर्माण होते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गाड्यांचा खोळंबा सोडवावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
संपादकीय भूमिकाप्रवाशांची गैरसोय दूर करणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आवश्यक आहे. |