आम्हाला धर्मशिक्षित हिंदु राष्ट्र पाहिजे ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन

पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन

नोएडा (उत्तरप्रदेश) – प्रत्येक राष्ट्राची संस्कृती असते; पण भारतात तशी संस्कृती नाही. राज्यघटनेच्या कलम २८ मध्ये लिहिले आहे, ‘हिंदु शाळांमध्ये वेद, पुराण शिकवू शकत नाही; परंतु अन्य पंथीय त्यांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास शिकवू शकतात.’ आम्हाला धर्मशिक्षित हिंदु राष्ट्र पाहिजे, ज्यात अन्याय, द्वेष, लोभ यांना स्थान नसेल. आम्हाला काय मिळेल ? याचा विचार न करता आमच्या पुढील पिढीला काय मिळेल ? याचा विचार करायला पाहिजे. काही काळापर्यंत भारतात संस्कृतचे पंडित अधिक प्रमाणात होते; पण आज इंग्रजी भाषेने सर्व भारतीय भाषांवर वर्चस्व निर्माण केले आहे, असे मार्गदर्शन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ईशान म्युझिक कॉलेज, सेक्टर १२ मध्ये हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

या अधिवेशनाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. विपिन कौशिक यांनी केले. या अधिवेशनाला नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद येथील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तरुणांचा राजकीय दुरुपयोग झाल्याने ते राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यापासून दूर रहात आहेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

जेव्हा आम्हाला समाजाची दयनीय स्थिती समजेल, तेव्हा समाजात परिवर्तन होईल. समाजात शांती स्थापन करण्यासाठी अशांतीला दूर करावे लागेल. जर कुणी हिंसा करत असेल, तर सरकार, पोलीस आणि प्रशासन यांना हिंसा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी त्यांना बाध्य करणे, ही अहिंसाच आहे. मागील काळात युवकांचा राजकीय दुरुपयोग झाल्याने समाजात अविश्वास निर्माण झाला. त्यामुळे आजचे हिंदु तरुण राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास सिद्ध नाहीत. जोपर्यंत आपण कर्महिंदु बनत नाही, तोपर्यंत आपण स्वत:ला हिंदु समजू शकत नाही; म्हणून आपल्याला धर्म आणि अधर्म समजून घ्यावा लागेल अन् त्यासाठी  चित्तशुद्धी करावी लागेल.

 हिंदूंच्या शोभायात्रांवर दगडफेक करणे, हा जिहादच !- विनोदकुमार सर्वाेदय

हिंदूंच्या शोभायात्रांवर दगडफेक, गोहत्या आणि हिंदु मुलींचे अपहरण करणे, हे सर्व जिहादच आहे. आधी आमच्या वरातींवर आक्रमण करायचे, आज शोभायात्रांवर आक्रमण करतात.

‘लव्ह जिहाद’ विषयी कुटुंब आणि समाज यांच्यामध्ये जागृती आवश्यक ! – अधिवक्ता मणी मित्तल

‘लव्ह जिहाद’चे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अन्य पंथीय मंदिरात जाऊन आणि व्रते ठेवून हिंदु मुलींची फसवणूक करतात. आज चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून समाजातील नैतिकता भ्रष्ट केली जात आहे. यांविषयी आपले कुटुंब आणि समाज यांच्यामध्ये जागृती करणे आवश्यक आहे.

काश्मीरसारखी स्थिती आज अनेक राज्यांत आहे ! – सुनीता दुर्रानी

काश्मीरची स्थिती जी संपूर्ण जगाने पाहिली आहे, आज तीच स्थिती भारताच्या विविध राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिर १ वर्षापर्यंत जाळण्यात आले, तरीही ते संपूर्णपणे नष्ट होऊ शकले नाही.

 ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे अभिनंदन केले पाहिजे ! – अजय दुर्रानी

‘द काश्मीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी हिंदूंचे दु:ख लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

 अहिंदूंच्या ‘घरवापसी’साठी निरंतर प्रयत्नरत राहीन ! –  राकेश शहा

अहिंदू आणि धर्मनिरपेक्ष हिंदू यांना पुनश्च हिंदु धर्मात आणून त्यांची ‘घरवापसी’ करणे, ही माझी चळवळ आहे आणि त्यासाठी मी निरंतर प्रयत्न करत राहीन.