ध्येय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज

  • उत्साही वातावरणात सोलापूर येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनास प्रारंभ !

  • सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड येथील हिंदुत्वनिष्ठ उपस्थित !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून पू. दीपाली मतकर, सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये

सोलापूर, १ मे (वार्ता.) – दैनिक ‘सनातन प्रभात’ जनप्रबोधनाचे मोठे कार्य करत आहे. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांची प्रगती आपल्याला दिसली पाहिजे; मात्र सद्यःस्थितीत तसे होतांना दिसत नाही. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्राच्या पुनर्निर्माण आणि प्रेरणादायी अशा गोष्टीचे मी अभिनंदन करतो ! यापुढील काळात आपण ध्येय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज यांनी केले. ते १ मे या दिवशी सोलापूर येथे किल्लेदार सभागृह येथे आयोजित प्रांतीय अधिवेशनात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या अधिवेशनास सनातन संस्थेच्या संत पू. श्रीमती मंदाकिनी डगवार यांचीही वंदनीय उपस्थिती होती. या अधिवेशनासाठी सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड येथील १०० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित आहेत. प्रारंभी शंखनादानंतर पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आले. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन पू. दीपाली मतकर यांनी केले.

अधिवेशनासाठी उपस्थित धर्मप्रेमी

सत्कार – पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी, सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा सत्कार धर्मप्रेमी सौ. छाया दोडके, पू. दीपाली मतकर यांचा सौ. मंदाकिनी कोकणे, पू. श्रीमती मंदाकिनी डगवार यांचा सत्कार धर्मप्रेमी सौ. छाया दोडके यांनी, तर श्री. मनोज खाडये यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब ढगे यांनी केला.

उपस्थित मान्यवर – धाराशिव येथील ह.भ.प. इश्वर महाराज कुंभार, वारकरी महामंडळ तालुका कार्याध्यक्ष आणि तुळजापूर येथील ‘जीवनमुक्ती सेवा मंडळ ट्रस्ट’चे सचिव ह.भ.प. दीपक महाराज निकम, तसेच कामती येथील ह.भ.प. प्रभाकर महाराज वाघचौरे

सत्र १

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजासह ब्राह्मतेज आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सत्रात मार्गदर्शन करतांना पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज, श्री. मनोज खाडये, सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये आणि पू. दीपाली मतकर

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजासह ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक स्तरावर होऊ शकत नाही, तर त्यासाठी ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे. संख्याबळ महत्त्वाचे नसून ब्राह्मतेजाचे (साधनेचे) बळ महत्त्वाचे आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि अर्जुन यांची उदाहरणे आपल्यासाठी आदर्श आहेत. ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन नियमित प्रयत्न करणे म्हणजे साधना. देवतेला प्रार्थना करून भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करता येतो, तसेच प्रार्थनेमुळे देवतेचे तत्त्व कार्यरत झाल्याने कोणतेही कार्य ‘मी केले’ हा कर्तेपणा रहात नाही. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळीचे योग्य नियोजन आणि ती तडीस नेण्यासाठी साधना आवश्यक आहे. साधनेमुळे कोणत्याही परीस्थितीला सामोरे जाण्याचे बळ प्राप्त होते. हिंदूंचा गौरवशाली इतिहासाचा आदर्श आपल्या समोर असल्याने मूठभर हिंदूंसह आपण हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या ‘ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजाची आवश्यकता’, या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलतांना होत्या.

विशेष – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन चालू असतांना ‘साधना’ आणि ‘प्रार्थना’ हे ग्रंथ व्यासपिठावरून दाखवण्यात आले.

कोरोना काळात ‘तबलिकी’ हे कोरोना ‘कॅरियर’ ठरले, तर हिंदुत्वनिष्ठ कोरोनाचे ‘वॉरियर’ ठरले ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सत्रात मार्गदर्शन करतांना डावीकडून श्री. योगेश तुरेराव, श्री. मनोज खाडये आणि श्री. हिरालाल तिवारी

या प्रसंगी बोलतांना श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘कोरोना संसर्गाच्या कालावधीत तबलीकी जमातीचे लोक हे कोरोना ‘कॅरियर’ ठरले, तर हिंदुत्वनिष्ठांनी लोकांना वाचवण्याचे जे काम केले. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कोरोनाचे ‘वॉरियर’ ठरले.

१. केवळ संघटन करून उपयोग नाही, तर ते यशस्वी केले पाहिजे आणि त्यासाठी साधना हवी !

२. हलाल उत्पादने थांबली तर १६ प्रकारचे विविध जिहाद संपुष्टात येतील. या जिहादी कारवायांचा कणा मोडून काढण्यासाठी ‘हलाल अर्थव्यवस्थे’ला विरोध करा.

३. देशातील प्रसिद्धीमाध्यमे हलालचे वास्तव समाजासमोर आणत नसल्याने ‘हलाल’चे वास्तव लोकांसमोर आणण्यासाठी आपल्यालाच प्रसिद्धीमाध्यम बनावे लागेल !

सत्र २

अधिवेशनामध्ये सोलापूर येथील दैनिक ‘अग्रणी वार्ता’चे संपादक आणि ‘वन्दे मातरम्’ पत्रकार कक्षाचे अध्यक्ष श्री. योगेश तुरेराव यांनी ‘हलाल जिहादसारखे ज्वलंत विषय प्रसार माध्यमे का हाताळत नाहीत ?’ या विषयी संबोधित केले.

‘हलाल जिहाद’ अर्थव्यवस्थेच्या आक्रमणाविषयी देशातील ९० टक्के जनता अनभिज्ञ ! – श्री. योगेश तुरेराव, संपादक

‘हलाल जिहाद’ अर्थव्यवस्थेच्या आक्रमणाविषयी देशातील ९० टक्के जनता अनभिज्ञ आहे. हलाल अर्थव्यवस्था हे हिंदूंवरील एक मोठे आक्रमण आहे, ते परतवून लावण्यासाठी हिंदूंमध्ये संघटन होणे आवश्यक आहे. भारतामध्ये अल्पसंख्यांकांच्या नावाखाली मुसलमानांना सुविधा उपलब्ध केल्या. डाव्या विचारसरणीच्या राष्ट्रांमध्ये उदा. चीन, जर्मनी, फ्रान्स येथे मुसलमानांना धार्मिक विधी करण्यास मज्जाव करण्यात येतो; मात्र भारतामध्ये ते वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. तुर्की येथे केवळ तुर्की भाषेतच कुराणचे पठण करावे लागते; मात्र भारतामध्ये अजानच्या वेळी भोंग्यांवरील नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. हिंदु जनजागृती समितीचे मी अभिनंदन करतो की, समितीच्या वतीने हलाल जिहादसारख्या संकटांविषयी लोकांमध्ये जागृती केली जाते.

सर्वसामान्य जनतेने ‘हलाल जिहाद’च्या विरोधात आवाज उठवावा ! – श्री. योगेश तुरेराव

हलाल जिहादविषयी प्रसारमाध्यमे गप्प आहेत; कारण ‘मिडिया’चे हात बांधलेले आहेत. निरपेक्षपणे पत्रकारिता करणारी प्रसारमाध्यमे नगण्य आहेत, तर अनेक वृत्तमाध्यमे पूर्णपणे व्यावसायिक झाली आहेत. भांडणाची ‘ब्रेकींग न्यूज’ करण्यासाठी तत्पर असलेले पत्रकार हिंदूंवरील आघात दाखवण्यास उदासिन असतात. ज्या प्रसारमाध्यमांना याविषयी जागृती करण्याची इच्छा असते त्यांना अपेक्षित पाठबळ मिळत नाही. जनतेच्या मागणीला महत्त्व आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने याविषयी आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

सद्गुरु (सुश्री)) स्वाती खाडये यांनी आवाहन केल्यानंतर सर्वांनी २ मिनिटे ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप केला.

विशेष

धर्मप्रेमींच्या स्वागतासाठी लावलेला वैशिष्ट्यपूर्ण फलक

१. आपल्या मार्गदर्शनात सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी सोलापूर येथे १५ मे या दिवशी होणार्‍या हिंदू एकता दिंडीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

२. वक्त्यांची भाषणे चालू असतांना सर्वजण एकाग्रतेने विषय ऐकत होते आणि लिहूनही घेत होते.

३. विविध भागांतून आलेले असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये एकत्र कुटुंब भावना जाणवत होती.

४. श्री. मनोज खाडये यांचा विषय चालू असतांना त्यांच्या अनेक वक्तव्यांना धर्मप्रेमींनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे दाद दिली.