पुणे – कर्नाटकातील बहुचर्चित पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी भाजपच्या नेत्या दिव्या हागारगी यांना कर्नाटक राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) २९ एप्रिल या दिवशी पुण्यातून अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी १७ जणांना अटक केलेली आहे. त्यामध्ये दिव्या हागारगी यांचे पती राजेश हागारगी यांचा समावेश आहे.
या प्रकरणी दिव्या हागारगी यांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आल्यापासून त्या पोलिसांना गुंगारा देत होत्या. तत्पूर्वी गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत हागारगी यांच्यासह ६ जणांविरोधात पकड आदेश जारी केले होते.
संपादकीय भूमिकाघोटाळा प्रकरणात नेत्यांचा सहभाग चिंताजनक ! |