‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !
सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?
राज ठाकरे भोंग्यांविषयीची पुढील भूमिका आज मांडणार
आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याविषयी पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या, ३ मे या दिवशी ‘ट्वीट’ करून सांगीन, असे ‘ट्वीट’ राज ठाकरे यांनी २ मे या दिवशी केले.
सत्पुरुषांना दान करून आध्यात्मिक लाभ घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था
अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा क्षय होत नाही; परंतु जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपण ते सत्पात्रे द्यायला हवे.
मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !
ट्विटर नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करणार
प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी सामाजिक माध्यम ट्विटर कह्यात घेतल्यानंतर त्याच्या व्यवस्थापकीय मंडळात पालट करणार असल्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांची गच्छंती होणार आहे.
युक्रेनने काळ्या समुद्रात गस्ती घालणाऱ्या रशियाच्या २ युद्धनौका बुडवल्या !
युक्रेनने ड्रोनचा (मानविरहित यंत्राचा) वापर करून दोन गस्ती नौकांवर आक्रमण केले. यात दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्या. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.
भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
संजय राऊत पुढे म्हणाले की, भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे, हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही. हे लेचापेचांचे राज्य नाही. भोंग्यांविषयी काय करायचे, हे सरकारला माहिती आहे.
नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा अहवाल ५ मेपर्यंत सादर करण्याचा न्यायालयाचा निर्देश !
अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यास अनुमती मिळावी, अशी विनंती त्यांच्या अधिवक्त्यांनी २ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.
राज ठाकरे यांच्या सभेविषयी सर्व गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे या दिवशी येथे जाहीर सभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडली. या सभेसाठी येथील पोलिसांनी १६ अटीं घालून दिल्या होत्या.