युक्रेनने काळ्या समुद्रात गस्ती घालणाऱ्या रशियाच्या २ युद्धनौका बुडवल्या !

युक्रेनने रशियाच्या युद्धनौका नष्ट केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

कीव (युक्रेन) – काळ्या समुद्रात गस्ती घालणाऱ्या रशियाच्या युद्धनौका नष्ट केल्याचे युक्रेनने सांगितले आहे. युक्रेनने ड्रोनचा (मानविरहित यंत्राचा) वापर करून दोन गस्ती नौकांवर आक्रमण केले. यात दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्या. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. तसेच याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. दोन्ही नौका काळ्या समुद्रात बुडाल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. तसेच युक्रेनने युद्धनौकेवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे सांगितले. गस्ती नौकेवर २३ कर्मचारी असतात.