दिवाळीत ए.पी.एम्.सी. परिसराला वाहतूककोंडीतून दिलासा !

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ सहस्र ४४२ वाहनचालकांवर कारवाई !

नवी मुंबई – ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांनी यंदाच्या दिवाळीत ए.पी.एम्.सी.च्या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे यंदा या परिसरात नागरिकांना वाहतूककोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला. येथील ग्राहक आणि दुकानदार यांनी यासाठी समाधान व्यक्त केले आहे. या विशेष मोहिमेमध्ये जनप्रबोधन आणि कारवाई करण्यात आली. या कालावधीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ सहस्र ४४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये १२ लाख ७७ सहस्र रुपये दंड आकारण्यात आला, तसेच २ लाख ७८ सहस्र ४५० रुपये दंड वसूल करण्यात आला.