|
मुंबई – राज्यात २० नोव्हेंबर या दिवशी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, आस्थापने आणि संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी, तसेच अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर या दिवशी पगारी सुट्टी देणे संबंधित नियोक्त्यांसाठी (नियोक्ता म्हणजे एक व्यक्ती किंवा संस्था जी कर्मचार्यांना कामावर ठेवते) बंधनकारक राहील, असे आदेश काढण्यात आले आहेत. ‘या नियमांचे पालन न करणार्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाईल’, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.