नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा अहवाल ५ मेपर्यंत सादर करण्याचा न्यायालयाचा निर्देश !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई – अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यास अनुमती मिळावी, अशी विनंती त्यांच्या अधिवक्त्यांनी २ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. मूत्राशयाच्या विकारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नवाब मलिक यांच्याकडून न्यायालयात वैद्यकीय जामिनासाठी अर्ज केला आहे. नवाब मलिक यांच्या आरोग्याविषयी ५ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने जे.जे. रुग्णालय प्रशासनाला दिला आहे. आर्थिक अपहाराप्रकरणी नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून प्रकृतीच्या कारणास्तव सध्या त्यांच्यावर जे.जे. या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे.