ट्विटर नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करणार

डावीकडून इलॉन मस्क, पराग अग्रवाल

न्यूयॉर्क – प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी सामाजिक माध्यम ट्विटर कह्यात घेतल्यानंतर त्याच्या व्यवस्थापकीय मंडळात पालट करणार असल्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांची गच्छंती होणार असून त्याजागी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मस्क यांनी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड केल्याचे समोर आले आहे. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती ट्विटरची ४४ अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांची जागा घेणार आहे. मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. अग्रवाल यांना १२ मासांआधीच काढून टाकले तर आस्थापनेला त्यांना ३८.७ अब्ज डॉलर (सुमारे २९६ कोटी रुपये) द्यावे लागतील.