चौकशीसाठी नगररचना विभागाकडून टाळाटाळ ! : नाशिक येथील म्हाडा घोटाळ्याचे प्रकरण

महापालिका क्षेत्रामध्ये गरिबांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या हस्तांतरणात घोटाळा झाला होता. त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. याविषयीचा प्रत्यक्ष स्थळ पहाणीचा अहवाल दिला जात नाही.

उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकांच्या जागा भाड्याने देण्यासाठी एस्.टी. महामंडळ सर्वेक्षणाच्या सिद्धतेत !

आर्थिक स्थिती खालावल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एस्.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत बसस्थानकांच्या मोक्याच्या कोणत्या जागा भाड्याने देता येतील ? याविषयी सर्वेक्षण चालू आहे.

(म्हणे) ‘काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून द्वेष निर्माण करत आहेत !’ – शरद पवार

‘शरद पवार यांनीच हे आरंभापासून चालू केले’, असे जर अनेकांना वाटत आहे, तर आता हे म्हणण्याचा पवार यांना अधिकार आहे का ?

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी झाले होते.

मृत व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून ४७ लाख रुपयांची फसवणूक !

मृत व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून लघु पाटबंधारे विभागाच्या अंबरनाथ तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या कुशिवली धरणामध्ये भूसंपादित भूमीचा मोबदला लाटणाऱ्या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कल्याण येथील गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘मायटोकन’ आस्थापनाचा संचालक अटकेत !

कल्याण शहर परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली.

पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारावरील घरे रिकामी करा ! : ठाणे महानगरपालिकेकडून नोटीस !

केवळ नोटिसा बजावण्याची औपचारिकता पूर्ण न करता त्यानुसार नागरिकांकडून कृतीही करून घेणे अपेक्षित आहे !

अकार्यक्षमांना घरचा रस्ता !

सेवेत कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत रेल्वे मंत्रालयाने १९ अधिकाऱ्यांना एकाच वेळी घरचा रस्ता दाखवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सहसचिव स्तरावरील १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मंदिरे करमुक्त करा !

मुळात ‘मंदिरांवर कर कसा काय ?’ हा सर्वसाधारण भाविकांना पडलेला गहन प्रश्न आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. हिंदु संस्कृतीचे रक्षण, संवर्धन अन् प्रसार करण्यासाठी गेली सहस्रावधी वर्षे मंदिरांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

प्रत्येक आरोपीला अशा प्रकारची कठोर शिक्षा झाल्यास बलात्कारांचे प्रमाण न्यून होईल !