ठाणे, १२ मे (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिका क्षेत्रातील डोंगर भागात वसलेल्या घरांना पावसाळ्यात दुर्घटना होऊन मनुष्यहानी होऊ नये, यासाठी नोटीस बजावण्यास येत आहे. ‘तेथील झोपड्यांचा वापर तात्काळ बंद करून इतरत्र सुरक्षित निवासाचा पर्याय शोधावा’, अशी सूचना तेथील नागरिकांना देण्यात येत आहे. ‘नोटिसीनंतरही लोक घरांमध्ये रहात असतील आणि त्यात कोणतीही दुर्घटना घडली, तर त्याला पालिका उत्तरदायी रहाणार नाही’, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिकाकेवळ नोटिसा बजावण्याची औपचारिकता पूर्ण न करता त्यानुसार नागरिकांकडून कृतीही करून घेणे अपेक्षित आहे ! |