अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, १२ मे (वार्ता.) – जिल्ह्यात भूत उतरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे आणि मुलीच्या आईसमवेतही अश्लील कृत्य करणे या प्रकरणी मिस्रीबाबा उपाख्य रामलाल सुखदेव शर्मा या भोंदूबाबाला १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पॉक्सो आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला होता. त्याची सुनावणी विशेष पॉक्सो न्यायालयात झाली. न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी या प्रकरणी निकाल सुनावला.

संपादकीय भूमिका

प्रत्येक आरोपीला अशा प्रकारची कठोर शिक्षा झाल्यास बलात्कारांचे प्रमाण न्यून होईल !