पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे एकूण ३१ शाळा अवैध !

भ्रष्ट आणि लयाला गेलेली शिक्षणव्यवस्था हे लोकशाहीचे अपयश आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही !

पक्षांतर बंदी आणि पक्षनिष्ठा !

सध्या सर्वच राजकीय पक्षांत विविध विचारांच्या नेत्यांची सरमिसळ झालेली पहायला मिळते. हे नेते पक्षाच्या तत्त्वाने बांधील नसतात, ते सत्ता आणि पद यांसाठी एकवटलेले असतात. सर्वच पक्षांत चालू असलेली ही पक्षांतरे हे त्याचेच लक्षण आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता ‘जनतेच्या भल्यासाठी काम करणारे नेते सध्या किती आहेत ?’ हा अभ्यासाचा विषय ठरेल !

सांगलीसाठी नवीन भव्य महापालिका इमारत, तसेच कृषी भवन होणार !

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने निर्णय

संभाजीनगर महापालिका गरीब विद्यार्थ्यांसाठी चालू करणार ‘सी.बी.एस्.ई.’ शाळा !

महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि इमारती आहेत तेथे ‘सी.बी.एस्.ई’चा अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे. सध्या आहे त्या शिक्षकांवर अभ्यासक्रमाचे दायित्व देण्यात आले असून नंतर शिक्षकांची भरती करण्याचा मानस आहे.’’

संभाजीनगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी सहशिक्षक निलंबित !

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई !

पाकमधून आलेले शरणार्थी हिंदू भारतातही असुरक्षित !

जोधपूर (राजस्थान) येथे पाकमधून आलेल्या शरणार्थी दलित हिंदु कुटुंबावर ३०० हून अधिक मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. यात ३ जण घायाळ झाले. वाहनांच्या अपघातावरून झालेल्या वादातून हे आक्रमण करण्यात आले.

इतिहासाचा प्रवाह पालटून टाकणारे महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान आमच्या इतिहासात तेच आहे, जे चंद्रगुप्त मौर्य, सम्राट विक्रमादित्य यांचे आहे. या अत्यंत महापराक्रमी महाराजांसारखेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा समाजाला विजयोन्मुख करून इतिहासाचा प्रवाह पालटला.