१ लाख ६६ सहस्र रुपयांचा औषधसाठा जप्त
बीड – अनुमती न घेताच डॉक्टरांच्या नावे औषधे खरेदी करून औषधाचे दुकान थाटून औषधांची विक्री करणाऱ्या दुकानावर औषध प्रशासनाने २४ मे या दिवशी धाड टाकली. आष्टी तालुक्यातील पांढरवाडी फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. यात १ लाख ६६ सहस्र रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला असल्याचे औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त राजगोपाल बजाज यांनी सांगितले. (नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक)
पांढरवाडी फाट्यावर डॉ. सागर बडे यांचे हॉस्पिटल आणि पंचकर्म केंद्र आहे. त्याच्या शेजारी किशोर गर्जेंचे ‘आर्या मेडिकल’ नावाने औषधाचे दुकान आहे. डॉ. सागर बडेंच्या नावावर ठोक विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करून ती औषध दुकानातून विक्री केली जात होती. याला कोणतीही अनुमती नसल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या औषधांचे नमुने पडताळणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकासमाजाची नीतिमत्ता रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! |