पांढरी खानमपूर (जिल्हा अमरावती) येथे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुसलमान धर्माच्या मुलीवर घरच्यांकडून दबाव !

येथील पोलीस ठाण्यासमोर २ गटांत झालेल्या हाणामारीत १ हिंदु युवक घायाळ झाला आहे. मुलगी मुसलमान धर्मीय असल्याने २०० ते ३०० मुसलमानांनी गावात येऊन तिच्यावर दबाव आणला.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून ३ जणांचा मृत्यू !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘प्रोपोलिन गॅस’चा टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. खोपोली येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.

राज्यातील इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत, तर इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनला !

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च ते एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या निकालाचा दिनांक घोषित झाला आहे.

मध्य रेल्वेच्या फलाट तिकीटदरात पाचपट वाढ !

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाटाचा तिकीटदर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. ९ ते २३ मे या कालावधीसाठी तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका !

मशिदींपुढे हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन, तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे.

अशांवर कठोर कारवाई करा !

वडोदरा (गुजरात) येथील महाराजा सयाजीराव विश्वविद्यालयातील ‘फाइन आर्ट्स’च्या संदर्भातील एका प्रदर्शनात देवतांची चित्रे बनवण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कागदांचा वापर करण्यात आला. यातील बहुतेक कागदांवर बलात्काराच्या घटनांच्या बातम्या होत्या.

बंगालमध्ये हिंदु मुलींवरील नृशंस बलात्कार म्हणजे बंगालची दुसऱ्या काश्मीरकडे होणारी वाटचाल !

बंगालमध्ये एकेका हिंदु मुलीवर तृणमूल काँग्रेसचे १००-१०० कार्यकर्ते बलात्कार करत आहेत. याकडे देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी त्वरित लक्ष द्यायला हवे, तसेच चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी.

इस्लामवर श्रद्धा नसणाऱ्यांना अजान ऐकणे बंधनकारक का ?

सध्या इस्लामिक प्रथांनी विक्राळ रूप धारण केले आहे. बहुतांश धार्मिक गोष्टी या त्याच धर्माच्या लोकांना विशेष रूपाने समजणाऱ्या असतात.

‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’

अरुणाचल प्रदेश येथेही पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या आहे. महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यायला हवे की, धर्मांतरासमवेत संस्कृतीही धोक्यात येते.

अल्पसंख्यांक दर्जा हा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय

मुसलमान आणि ख्रिस्ती यांना अल्पसंख्यांक म्हणून विशेष सुविधा देऊन हिंदूंची प्रतारणा केली जात आहे.