संभाजीनगर – महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च ते एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या निकालाचा दिनांक घोषित झाला आहे. इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत, तर इयत्ता १२ वीचा निकाल १० जून या दिवशी लागणार आहे, अशी माहिती मंडळाकडून ९ मे या दिवशी देण्यात आली. आहे. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या एकूण ३० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (राज्य मंडळ) इयत्ता १० वीची परीक्षा १५ मार्चपासून चालू झाली होती. १६ लाख ३९ सहस्र १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून राज्यात २१ सहस्र ३८४ ठिकाणी परीक्षा झाली आहे.