राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका !

राज ठाकरे

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी ९ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. मशिदींपुढे हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन, तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे.

राज ठाकरे यांच्या आवाहनामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए.के. मेनन आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात ही याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली आहे. या वेळी न्यायालयाने ‘सुनावणीसाठी दिनांक देण्यात येईल’, असे सांगितले आहे.