बीजिंग (चीन) – चीनच्या शांघाय शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे ५१ मृत्यू झाल्याची नोंद झाली, तर बीजिंगमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराच्या उच्चभ्रू भागात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत. तेथे सुमारे ३५ लाख लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. चीनमध्ये २४ एप्रिल या दिवशी कोरोनाचे २० सहस्र १९० नवे रुग्ण नोंदवले गेले. त्यांतील बहुसंख्य नागरिकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. शांघायमध्ये कोरोनाचे २ सहस्र ४७२ रुग्ण आढळले आहेत.