पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणाची तालिबानकडून सुरक्षा परिषदेत तक्रार

काबूल (अफगाणिस्तान) – तालिबान सरकारने पाकिस्ताच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तक्रार केली आहे. तालिबानने आरोप केला आहे की, पाकच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या खोश्त आणि कुनार प्रांतामध्ये हवाई आक्रमण केले आहे. तालिबानच्या या तक्रारीचे समर्थन हक्कानी नेटवर्क आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या आतंकवादी संघटनांनी केले आहे. पाकच्या कारवाईत ५० जण ठार झाले होते. यात काही महिला आणि मुले यांचाही समावेश होता.

संपादकीय भूमिका

कालपर्यंत पाकच्या साहाय्याने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणाऱ्या तालिबानला आता पाकचा त्रास होत असेल, तर ती पाकला नियतीने दिलेली शिक्षाच होय !