मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या तासिकेपूर्वी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तारांकित प्रश्नांचा तास घोषित केला. विरोधकांनी सभापतींच्या आसनाच्या पुढील जागेत येऊन नवाब मलिक आणि सरकार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या गोंधळातही सभापतींनी कामकाज चालू ठेवल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे सभागृहात विरोधकांच्या अनुपस्थितीत तारांकित प्रश्नांवर चर्चा घेण्यात आली.