विधानसभेत निलंबित केलेले १२ आमदार कोणत्या नियमाच्या आधारे सभागृहात उपस्थित रहातात ? – काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा प्रश्‍न  

नाना पटोले

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२१ मध्ये पावसाळी अधिवेशनात १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले भाजपचे १२ आमदार यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या नियमाच्या आधारे उपस्थित रहातात ? सभागृहात येण्याविषयीची त्यांना अनुमती कुणी दिली ? त्यांना सभागृहात घेणे हे कोणत्या नियमात बसते ?, असे प्रश्‍न उपस्थित करून याविषयी सभागृहात माहिती दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत केली. हरकतीचे सूत्र उपस्थित करून त्यांनी ही मागणी केली.