
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारच्या विरोधातील पुरावे सादर केले. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपसह याविषयीचा पेनड्राईव्ह विधानसभेच्या उपाध्यक्षांना दिला; मात्र आता या सर्व गंभीर प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने वाढ करावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ९ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केली.
शासनाने मा.@Dev_Fadnavis यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करावी.@BJP4Maharashtra#SecurityForDevendraJi pic.twitter.com/eHJDdvUXJE
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 9, 2022
ते पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कटही उलगडला आहे. हा महाभयंकर कट दिसत असल्याने फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी. फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाविषयी होते, त्या कटाचे सूत्रधार विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण आहेत. त्यांच्याशी कुणाच्या गाठीभेटी होत आहेत, कोणत्या व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अथवा घरी जात आहेत. यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या गटाचे सूत्रधार चव्हाण असल्याने त्यांचीही सुरक्षा महत्त्वाची असून राज्य सरकारने चव्हाण यांनाही अधिक सुरक्षा पुरवावी.
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !