पोलिसांनी ध्वनीक्षेपक (डीजे) बंद केल्याच्या कारणावरून समाजकंटकांकडून शेगाव पोलीस ठाण्यावर आक्रमण !

समाजात पोलिसांचा धाक किती राहिला आहे, हे यावरून लक्षात येते. ज्या पोलिसांना स्वत:च्या कार्यालयाचे रक्षण करता येत नाही, ते जनतेचे, तसेच जनतेच्या मालमत्तेचे रक्षण कधी तरी करू शकतील का ?

हरिद्वार येथील धर्मसंसदेत मांडण्यात आलेले विचार हिंदूंचे विचार नाहीत ! – सरसंघचालक  

हिंदु समाजाची एकता आणि संघटन करणे, हे कुणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व आहे.

मध्यप्रदेश येथे लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संगीत संग्रहालय स्थापणार !

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संगीत संग्रहालय स्थापन करणार, तसेच त्यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली.

उडुपी (कर्नाटक) – महाविद्यालयाजवळून दोघा धर्मांधांना शस्त्रांसह अटक

हिजाबच्या प्रकरणावरून राज्यात तणाव आणि हिंसाचार निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ? याचा शोध सरकारने घेतला पाहिजे !

झारखंडमधील ३ जिल्ह्यांत श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी धर्मांधांची आक्रमणे !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हिंदुविरोधी सरकार असल्यामुळेच धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होत आहे. अल्पसंख्यांकांना जरा खरचटले, तरी हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे याविषयी का बोलत नाहीत ?

हवामान पालटामुळे भारताच्या किनारपट्टी भागांत पुराचा धोका वाढला ! – शास्त्रज्ञांचा अभ्यास

हवामानातील पालटामुळे भारताचा किनारपट्टी भाग, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र आणि दक्षिण हिंद महासागर येथे काही असामान्य पालट दिसू शकतात, असे शास्त्रज्ञांंच्या अभ्यासातून समोर आले आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

याविषयी आता प्राणीमित्र संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ? एरव्ही हिंदूंना असहिष्णु म्हणणारे पुरो(अधो)गामी याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या विरोधातील आंदोलन

कॅनडातील ख्रिस्त्यांचा हा हिंदुद्वेषच आहे ! त्यांच्या आंदोलनाचा आणि हिंदूंच्या मंदिरांचा कोणताही संबंध नसतांना अशा प्रकारची आक्रमणे करून लूटमार करणे, यातून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते !

‘ह्युंदाई’प्रमाणे ‘किआ’ आस्थापनाकडूनही फुटीरतावादी काश्मिरींच्या आंदोलनाला समर्थन

भारत सरकारकडून आतापर्यंत या आस्थापनावर कारवाई करणे अपेक्षित होते !

(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !