उडुपी (कर्नाटक) – महाविद्यालयाजवळून दोघा धर्मांधांना शस्त्रांसह अटक

उडुपी येथील महाविद्यालयांतील हिजाब घालण्याच्या मागणीचे प्रकरण

हिजाबच्या प्रकरणावरून राज्यात तणाव आणि हिंसाचार निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ? याचा शोध सरकारने घेतला पाहिजे !

हिजाबच्या प्रकरणावरून राज्यात तणाव

उडुपी (कर्नाटक) – येथील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून प्रवेश करण्याची मागणी मुसलमान विद्यार्थिनींकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यावर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सरकारने दोन्ही गोष्टी परिधान करून महाविद्यालयांत येण्यास बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर वाद चालू असलेल्यांपैकी एका महाविद्यालयाजवळ पोलिसांनी दोघा धर्मांधांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. रज्जाब आणि हाजी अब्दुल मजीद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे.

दोन मासांपूर्वी मुसलमानांकडून हिंदूंवर घालण्यात आला होता बहिष्कार !

हिंदूंच्या देशात हिंदूंवर बहिष्कार घालण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कशी ? भाजपच्या राज्यात हिंदूंना ते अपेक्षित नाही !

२ मासांपूर्वी उडुपी येथे हिंदु जागरण मंचकडून गंगोली येथे गोवंश चोरी आणि गोहत्या यांविरोधात निदर्शने करण्यात आली होती.

यात मासेमार, मासे विक्रते आणि महिला यांच्यासह शेकडो लोकांनी भाग घेतला होता. त्यानंतर येथील मुसलमानांनी हिंदूंवर बहिष्कार घालण्यास प्रारंभ केला. त्यांनी गंगोली बाजारातून हिंदूंकडून मासे खरेदी करण्यावर बहिष्कार घातला होता.