(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

पाकचे पतंप्रधान इम्रान खान यांची चीनमध्ये उपस्थित केला काश्मीरचा प्रश्‍न

  • काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !
  • तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !
  • भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खुपण्याचा चीनला काय अधिकार ?, असा प्रश्‍न भारताने चीनला खडसावून विचारणे आवश्यक !
पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – काश्मीर प्रश्‍न इतिहासात शिल्लक राहिलेला वाद आहे, जो संयुक्त राष्ट्रांची सनद, सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करारांच्या आधारे शांततेने सोडवला गेला पाहिजे. चीन कोणत्याही एकतर्फी कारवाईला विरोध करतो ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे चीनकडून पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित करण्यात आल्यावर सांगण्यात आले. इम्रान खान सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या बैठकीत त्यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. त्यावर चीनकडून वरील विधान करण्यात आले.

या वेळी शी जिनपिंग म्हणाले की, राष्ट्रीय स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि आतंकवादाशी लढण्यासाठी चीन पाकिस्तानला पाठिंबा देतो, चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग यांचा विकास आणि मोठे प्रकल्प सुरळीत चालू ठेवण्यासाठी चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करण्यास सिद्ध आहे. (पुढे चीनने पाकला स्वतःच्या नियंत्रणात घेतले आणि चीनमधील उघूर मुसलमानांप्रमाणे पाकमधील मुसलमानांवर अत्याचार चालू केले, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)