मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संगीत संग्रहालय स्थापन करणार, तसेच त्यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली. ‘संगीत विद्यापिठात मुलांना सुरांचा सराव करता येईल, तसेच लतादीदींची सर्व गाणी संग्रहालयात उपलब्ध असतील’, असेही त्यांनी सांगितले.
लता जी का जन्म इंदौर में हुआ था। हमने फैसला किया है कि इंदौर में लता जी के नाम से संगीत अकादमी स्थापित की जाएगी। संगीत महाविद्यालय, जहां बच्चे सुरों की साधना कर सकेंगे। संग्रहालय स्थापित होगा जिसमें उनके सभी गीत उपलब्ध रहेंगे।#LataMangeshkar pic.twitter.com/xgsjulcZ4H
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 7, 2022
राज्यसभेत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
नवी देहली – भारतरत्न लता मंगेशकर यांना संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रद्धांजली वाहण्यात आली.
(सौजन्य : TV9 Marathi)
राज्यसभेत राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सभागृहातील सर्व सदस्य यांनी १ मिनिट मौन पाळून ही श्रद्धांजली वाहिली.
नेपाळच्या राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या राष्ट्रपती बिद्यादेवी भंडारी यांनी नेपाळी जनतेच्या वतीने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
नेपाल की राष्ट्रपति भंडारी ने लता मंगेशकर को दी श्रद्धांजलि#Nepal #LataMangeshkar https://t.co/zLyyhwINLu
— Zee News (@ZeeNews) February 7, 2022
त्यांनी म्हटले, ‘अनेक नेपाळी गाण्यांना आपल्या मधुर आवाजाने सजवणार्या प्रसिद्ध भारतीय गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. विलक्षण प्रतिभा असलेल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.’
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ