झारखंडमधील ३ जिल्ह्यांत श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी धर्मांधांची आक्रमणे !

धर्मांधांच्या आक्रमणात १ हिंदु तरुण ठार !

  • झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हिंदुविरोधी सरकार असल्यामुळेच धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होत आहे. अल्पसंख्यांकांना जरा खरचटले, तरी हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे याविषयी का बोलत नाहीत ? – संपादक
  • झारखंड भारतात आहे कि पाकमध्ये ? हिंदूंना त्यांच्या प्रथा-परंपरा पाळतांना बहुतांश वेळा धर्मांधांच्या हिंसक विरोधाचा सामना करावा लागतो. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक

रांची (झारखंड) – झारखंड राज्यातील हजारीबाग, कोडरमा आणि जामताड या जिल्ह्यांमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याने येथे तणाव निर्माण झाला. हजारीबाग येथे रूपेश कुमार या १७ वर्षांच्या मुलाची धर्मांधांनी हत्या केली. तो मूर्ती विसर्जन करून परतत असतांना हजारीबाग येथील नईटांड गावातील लखना दूलमाहा इमामबाडामध्ये धर्मांधांसमवेत झालेल्या वादातून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने या भागातील वाहनांना पेटवले. तसेच एक घर जाळण्याचाही प्रयत्न केला. या वेळी उपस्थित पोलिसांनी हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र गोळीबार केल्याचे नाकारले आहे.

 (सौजन्य : Swatva)

कोडरमा येथील आक्रमणात ८ जण घायाळ

कोडरमा जिल्ह्यातील कर्बलानगरामध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी आक्रमण केले. या वेळी दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये ८ जण घायाळ झाले.

जामताडा येथे मशिदीसमोरील मार्गावरून विसर्जन मिरवणूक नेण्यास धर्मांधांचा विरोध !

हिंदूंना धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्ष आता का बोलत नाहीत कि ‘धर्मांधांसाठी सर्वधर्मसमभाव लागू नाही’, असे त्यांना वाटते ? – संपादक

जामताडा जिल्ह्यातील फिटकोरिया गावामध्ये विसर्जनाच्या वेळी वाटेत मशीद लागत होती. ‘मशिदीच्या मार्गावरून विसर्जनाची मिरवणूक काढल्यास परिणाम वाईट होतील’, अशी धमकी धर्मांधांनी दिली होती. यामुळे प्रशासकीय अधिकारी अजफर हसनैर, गुजलाज अंजुम आणि पोलीस यांनी मशिदीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गावरून मिरवणूक नेण्याचे नियोजन केले. तसेच या वेळी ‘डीजे’ लावू नये, अशीही अट घालण्यात आली. यानंतर मिरवणूक काढण्यात आली. तरी या मार्गावर एका ठिकाणी धर्मांधांनी पुन्हा विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रशासनाने त्यांची समजूत काढली. त्यामुळे मिरवणूक पुढे जाऊ शकली.