कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या विरोधातील आंदोलन

आंदोलनकर्त्यांकडून हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड आणि लूटमार !

  • कॅनडातील ख्रिस्त्यांचा हा हिंदुद्वेषच आहे ! त्यांच्या आंदोलनाचा आणि हिंदूंच्या मंदिरांचा कोणताही संबंध नसतांना अशा प्रकारची आक्रमणे करून लूटमार करणे, यातून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! – संपादक
  • हिंदूंना ‘असहिष्णु’, ‘तालिबानी’ म्हणणारे ‘भारतातील हिंदू आंदोलकांनी कधी चर्च आणि मशिदी यांमध्ये लूटमार केली आहे का ?’, हे सांगतील का ? – संपादक

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक केल्याने गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून विरोध केला जात आहे. या काळात कॅनडामध्ये हिंदूंच्या अनेक मंदिरांची तोडफोड करण्यासह मंदिराच्या दानपेटीतील पैसे, दागिने, मूर्ती यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनांमुळे ग्रेटर टोरंटो शहरातील मंदिरांचे पुजारी आणि हिंदू यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लसविरोधी आंदोलनामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो गेल्या काही दिवसांपासून अज्ञातस्थळी आहेत.

आंदोलनकर्त्यांनी १५ जानेवारी या दिवशी ग्रेटर टोरंटो या शहरातील ब्रॅम्पटन येथील हनुमान मंदिरावर पहिल्यांदा आक्रमण करून तोडफोड केली. त्यांनी मंदिरात चोरीही केली. त्यानंतर २५ जानेवारीला येथील माँ चिंतपूर्णी मंदिरात आक्रमण केले. यानंतर श्री गौरी शंकर मंदिर, श्री जगन्नाथ मंदिर, मिसिसॉगा येथील ‘हिंदु हेरिटेज’ सेंटर आणि हॅमिल्टन समाज मंदिर यांचीही तोडफोड  केली.