कर्णावती येथे पाकमधील जिहादी संघटनेसाठी गोळा केले जात आहेत पैसे !

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला पाहिजे !

कलम ३७० हटवल्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये ४३९ आतंकवादी ठार

इतके आतंकवादी ठार होऊनही काश्मीरमधील स्थिती सामान्य झालेली नाही. त्यामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य झालेले नाही. काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता पाकला नष्ट करणे आवश्यक !

‘इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर अमानुष अत्याचार !’ – अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीच काश्मीरमधील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांचा अहवाल प्रसिद्ध का केला नाही, हे सांगील का ?

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.

कोरोनामुळे कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या रागातून बिर्ला मंदिरातील राहू आणि केतु यांच्या मूर्तींची तोडफोड

हिंदूंना आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू, प्रारब्ध, जीवनाचा उद्देश आदींचे ज्ञान होते आणि तो सर्व सुख-दुःखांवर मात करून आनंदी राहू शकतो !

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदु व्यापार्‍याची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ?

एम्.आय.एम्.चे नेते वारिस पठाण यांना इंदूरमध्ये मुसलमान तरुणाने काळे फासले

वारिस पठाण देशाविषयी आणि धर्मांविषयी तेढ कोण निर्माण करत आहेत, हे यातून स्पष्ट होते ! अशा धर्मांध नेत्यांच्या विरोधात पठाण यांच्यात धर्मातील तरुणच विरोध करत आहेत, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

सातारा येथील ‘शिवसमर्थ शिल्प’ बंदिस्त !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात त्यांचे शिल्प बंदिस्त असणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ? 

पक्षाचे मूळ सदस्य असलेले १४ उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात केलेले २३ उमेदवार निवडून येण्याचा गोवा भाजपला विश्वास

भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.