‘भारतात निघून जा’ अशा मिळत होत्या धमक्या !
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ? – संपादक

घोटकी (पाकिस्तान) – घोटकी जिल्ह्याच्या डहारकी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या आक्रमणाच्या वेळी त्यांच्यासमवेत असणारा एक नातेवाईक हरीश कुमार हेदेखील गंभीररित्या घायाळ झाले. दहर समाजातील काही लोकांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी पाकमध्ये एका ख्रिस्ती व्यापार्याची हत्या करण्यात आली होती.
‘वे मारने, आँख फोड़ने, हाथ-पैर काटने की धमकी दे रहे’: पाकिस्तान में हिंदू व्यापारी की गोली मारकर हत्या, मिली थी भारत जाने की धमकी#Pakistan #Hindu https://t.co/V2HBuTlBgs
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 2, 2022
१. काही दिवसांपूर्वी सुतान यांनी त्यांना काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगत सुतान यांनी पोलिसांकडे साहाय्याची याचना केली होती. ‘पाकिस्तान हीच माझी मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. येथून मी कुठेही जाणार नाही’, असे सुतान यांनी त्यांना सांगितल्याचे म्हटले होते.
(सौजन्य : Republic World)
२. आक्रमणानंतर घायाळ झालेल्या सुतान यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्यांनी म्हटले, ‘माझ्यावर आक्रमण झाले आहे. भूमीच्या वादातून भाच्यानेच अन्य ४ जणांसहित माझ्यावर आक्रमण केले.’ हा व्हिडिओ प्रसारित होत आहे.
३. सुतान लाल यांच्या हत्येच्या विरोधात या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली. पाकिस्तानातील विरोधी पक्ष ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’च्या नवाज गटाकडून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला.
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता