कर्णावती येथे पाकमधील जिहादी संघटनेसाठी गोळा केले जात आहेत पैसे !

२ सहस्र दानपेट्या सापडल्या !

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला पाहिजे ! – संपादक

कर्णावती (गुजरात) – पाकिस्तानमधील इस्लामी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’ हिच्या जिहादी कार्यासाठी पैसे गोळा करता यावेत, यासाठी समाजात दानपेट्या फिरवल्या जात आहेत. शहरात अशा २ सहस्र दानपेट्या मिळाल्या आहेत. गुजरातमधील ‘संदेश’ या दैनिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे. दानपेट्यांतील पैसे मुसलमान तरुणांना भडकावण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मौलाना (इस्लामी विद्वान) उस्मानी हा दावत-ए-इस्लामीचे केंद्र चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. मौलाना उस्मानीचे नाव किशन बोलिया यांच्या हत्याकांडातही आले आहे.

‘दावत-ए-इस्लामी’चे मुख्यालय कराची शहरात आणि तिच्या शाखा जगभरात आहेत. या संघटनेची स्थापना वर्ष १९८१ मध्ये मौलाना अबू बिलाल महंमद इलियास अटारी याने केली होती. ही संघटना जिहादी कारवाया करण्यासाठी धर्मांधांना प्रेरित करते, असा तिच्यावर आरोप आहे. वर्ष २०२० मध्ये पॅरिस येथील ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाच्या कार्यालयावर झालेल्या आक्रमणातील आतंकवाद्यांनी त्यांचा मार्गदर्शक इलियास अटारी आहे, असे म्हटले होते.