सातारा येथील ‘शिवसमर्थ शिल्प’ बंदिस्त !

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात त्यांचे शिल्प बंदिस्त असणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ? 
  • शिवभक्तांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने हा विषय लवकर मार्गी लावावा ही अपेक्षा !
लोखंडी जाळी आणि पत्रे लावून बंदिस्त केलेले सातारा येथील ‘शिवसमर्थ शिल्प’

सातारा – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास्वामी नाहीत’ असा कांगावा करत काही समाजकंटकांनी येथील राजवाडा बसस्थानकातील ‘शिवसमर्थ शिल्पा’ला विरोध केल्यानंतर येथील शिल्प लोखंडी जाळी आणि पत्रे लावून बंदिस्त करण्यात आले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांना एस्.टी., पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी कारागृहात टाकले आहे, अशी भावना राष्ट्रभक्त व्यक्त करत आहेत.