हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी धर्मप्रेमींनी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने सध्या आपत्काळ चालू आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे वाढते बळ, राजकीय अस्थिरता, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात वाढत असलेल्या अडचणी ही सर्व आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत.

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर बिनविरोध निवड

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी कार्तिक कुडणेकर, तर उपाध्यक्षपदी दिक्षा खानोलकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुवर्णा तेंडुलकर यांची, तर उपाध्यक्षपदी कुशाली वेळीप यांची निवड झाली आहे.

देवाने बलात्कार केल्याचे सांगणारा कार्यक्रम प्रक्षेपित केल्यावरून आर्यलंडच्या दूरचिवावाहिनीची क्षमायाचना

आर्यलंडची सरकारी दूरचित्रवाहिनी ‘आरटीई’ने ३१ डिसेंबरच्या च्या सायंकाळी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात देवाला बलात्कारी दाखवल्याच्या प्रकरणी करण्यात आलेल्या १ सहस्रांहून अधिक तक्रारींनंतर या वाहिनीने क्षमायाचना केली आहे.

कोरोना लसीची आज पुन्हा रंगीत तालीम

राज्यात दुसर्‍यांदा कोरोना लसीची रंगीत तालीम ८ जानेवारीला घेण्यात येणार आहे. वाळपई, कांदोळी, म्हापसा, केपे, चिंचिणी आणि मडगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रे, तसेच मणिपाल आणि व्हिक्टर रुग्णालये येथे ही रंगीत तालीम होणार आहे.

केरळमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ उपक्रमांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

केरळमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने हिंदी भाषेत प्रवचन आणि सामूहिक नामजप या ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.

उत्तरप्रदेश आणि बिहार येथे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आयोजित प्रबोधन मोहिमेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित मोहिमेंतर्गत युवकांनी ‘आम्ही आजपासून आयुष्यभर चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच नवीन वर्ष साजरे करणार’, अशी प्रतिज्ञा केली.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या ६४ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका श्रीमती नंदिनी जोशी (वय ८१ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

भारताने बनवली जगातली पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ !

भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ गाडी बनवली आहे. जगातील कोणत्याही देशात अद्याप अशाप्रकारची विशेष रेल्वे बनवण्यात आलेली नाही. या रेल्वेमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असतील, तसेच अत्याधुनिक उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक तैनात असेल.

शेतकर्‍यांच्या लाभाच्या विधेयकाला राजकारणासाठी विरोध केला जात आहे ! – भाजप नेत्यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ  ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला.

दैनंदिन व्यवहारात जिल्ह्यातील कार्यालयांतून मराठीचा वापर करण्याची सक्ती करा ! – मनसेची मागणी

जिल्ह्यातील काही बँकांचे आणि संस्थांचे अधिकारी अन् कर्मचारी परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ते हिंदीत संभाषण करत असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दैनंदिन व्यवहारात मराठीत बोलण्याची सक्ती करा……