पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.

‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

यावरून जागतिक स्तरावर भारतीय आस्थापनांचे पाय ओढण्याचे कसे प्रयत्न केले जातात, हे यातून दिसून येते !

येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू होणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

कोरोना महामारीत लहान मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकत आहोत. नवीन वर्षात पहिल्या सोमवारी अर्थात् ३ जानेवारीपासून आम्ही १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू करत आहोत.

‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे पौगंडावस्थेतील मुसलमान मुलगी स्वेच्छेने विवाह करू शकते ! – उच्च न्यायालय

मुसलमान मुलीने पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे ती स्वत:च्या इच्छेनुसार कुणाशीही विवाह करून शकते. यामध्ये तिचे आई-वडील किंवा नातेवाईक हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

सिलचर (आसाम) येथे नाताळच्या कार्यक्रमात हिंदु तरुण-तरुणी यांनी सहभागी होण्यास काही लोकांचा विरोध

आसाममधील सिलचर येथे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ साजरा करत असतांना काही जणांनी त्याला विरोध केला. त्यांनी हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी केला एक दिवसाचा लाक्षणिक संप !

संप म्हणजे राष्ट्राची हानी, हे लक्षात घेऊन सामोपचाराने समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील ‘मे. रॉयल कार्बन’च्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका ! – महेश बालदी, आमदार

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील ‘मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली’ या आस्थापनेमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असा तारांकित प्रश्न आमदार महेश बालदी यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळाला न्याय !

विलंबाने न्याय मिळाल्यास संबंधिताला अन्याय झाल्यासारखे वाटू शकते !

देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून संस्कृती, धर्म, राष्ट्र यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारताला पुन्हा शिवाजी महाराज यांचे स्मरण झाले.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्वरित कारवाई केली असती, तर गोव्यातील सहस्रो स्वातंत्र्यसैनिकांना यातना भोगाव्या लागल्या नसत्या ! – नरेंद्र सावईकर, माजी खासदार

पंडित नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवले, ते ही सहस्रोंचे बळी गेल्यावर ! हा इतिहास सार्दिन यांना ज्ञात नसला, तरी तो लपून रहात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे !