पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा

श्रीराम पंचायतन मंदिरात झालेल्या या दिव्य सोहळ्याला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, गोवा येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक आणि प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक या संतत्रयींची उपस्थिती लाभली.

विशिष्ट संस्थेशी संलग्न असलेल्या काही अनुदानित शाळांनी गोवा मुक्तीदिन साजरा केला नाही ! – सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे नेते

अशा प्रकारे शाळांमध्ये गोवा मुक्तीदिन साजरा न करणार्‍या या संस्था गोवा मुक्तीचा इतिहास तरी शिकवत असतील का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कर्नाटक शासनाचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस कर्नाटकात भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !

काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिले आमदारकीचे त्यागपत्र : तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

काँग्रेसची गोव्यात दयनीय स्थिती : काँग्रेसच्या आमदारांची संख्या पोचली २ वर

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्री. राधाकृष्णन म्हणाले, “आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.”

भरती केंद्रासह सैनिकी रुग्णालय आणि वैद्यकीय उपकेंद्र चालू करा !

भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी

पुणे येथे शिवशाहिरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली !

अमित शहा यांनी १९ डिसेंबरच्या रात्री दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या कामाचा आढावाही त्यांनी या वेळी घेतला.

ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी यांचा ‘कीर्तनभीष्म कृतार्थता’ पुरस्काराने गौरव !

गोंदी येथे मराठवाडा नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित न करण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन !

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी धोकादायक ठरू शकते. म्हणून नाताळ आणि नववर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे.