संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.

साधनेसाठी एकप्रकारे संन्यासी जीवन अंगीकारलेले दांपत्य, प.पू. दास महाराज यांचे माता-पिता पू. रुक्मिणीमाता आणि प.पू. भगवानदास महाराज !

प.पू. दास महाराज यांचा सांभाळ करणारे विरागी दांपत्य प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी केलेल्या कठोर साधनेविषयी जाणून घेऊया.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची ‘सेवा कशी करावी ?’, याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन

२०.१२.२०२१ या दिवशी बांदा-पानवळ येथील प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळा’ झाला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सोहळ्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण होण्याच्या दृष्टीने साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे

सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.

‘सेवा हा गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, या भावाने सेवा करणार्‍या सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजी !

पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजींच्या तिसऱ्या मासिक श्राद्धानिमित्त पू. आजींचे कुटुंबीय आणि साधिकांना पू. आजींकडून शिकायला मिळालेली आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात मंडप घालण्याचे काम ‘सेवा’ म्हणून करणारे श्री. बाबली कळंगुटकर !

‘मी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमात ४-५ वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त मंडप घालण्याची सेवा करतो. ‘मी ही सेवा न्यूनतम दरात कशी होईल ?’, हे पहातो; मात्र दुसरीकडे काम करतांना माझा व्यावहारिक दृष्टीकोन असतो.

प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

प.पू. दास महाराज आणि पू. माई म्हणजे प्रेमाचा वहाता झराच आहे. शारीरिकदृष्ट्या त्यांचे पाय कमकुवत आहेत, तरीही त्यांचा देवाप्रती भाव असल्याने ते देवाला साष्टांग नमस्कार करतात.