एका शहरातील टपाल (पोस्ट) कार्यालयाकडून राष्ट्रध्वजाचा अनादर !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वजाप्रती आदर, राष्ट्रकर्तव्य यांचा अभाव दिसून येणे हे देशाला लज्जास्पद नव्हे का ?

प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवस ग्रामपंचायती बंद रहाणार !

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बंद पाळणार, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याची चेतावणी

ईश्वरी अधिष्ठान ठेवून, तसेच आपल्यातील शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – सौ. धनश्री केळशीकर, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी ईश्वरी अधिष्ठान ठेवून पाच पातशाह्या उद्ध्वस्त करून शौर्य गाजवले. आपल्यालाही ईश्वरी अधिष्ठान ठेवून शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे

कुपोषणाच्या संदर्भात कृती आराखडा सिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश !

या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मेळघाटात अनुमाने ४०० मुलांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी या वेळी उच्च न्यायालयात दिली.

अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

नवी मुंबईत कोरोनावरील लसीची बनावट प्रमाणपत्रे विकणार्‍या तिघांना अटक !

आरोपींकडून ७ बनावट प्रमाणपत्रे कह्यात घेण्यात आली आहेत. ३ सहस्र रुपयांना एका प्रमाणपत्राची विक्री केली जात होती. नितीन याचे मसाला बाजारामध्ये ऑनलाईन सेवाकेंद्र आहे, तर विराज आणि अमोल हे महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कंत्राटी वाहक आहेत.

नवी मुंबईत टाटा समूहाची ५ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक !

टाटा आस्थापनाद्वारे ५ सहस्र कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करून ७० सहस्र जणांना रोजगार देणार्‍या टाटा रिॲलिटीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कचे भूमीपूजन नवी मुंबईत करण्यात आले आहे.

तुकाराम सुपेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याविना एवढा मोठा घोटाळा शक्य नाही ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा करायची आणि दुसरीकडे लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळायचे असा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून चालू आहे.’’

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर खपवून घेणार नाही ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असून त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करणे चुकीचे आहे.”

म्हैशाळ (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस शिवसेनेकडून दुग्धाभिषेक !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण !