पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि धर्मपरायणतेचा गौरवशाली इतिहास अद्भुत लेखनाने आणि ओजस्वी वाणीने जनमानसात रुजवला, तसेच यांद्वारे राष्ट्र आणि धर्म रक्षणाची अखंड ज्योत पेटवली, असे गौरवोद्गार दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.
आज पुणे येथे कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि धर्मपरायणतेचा गौरवशाली इतिहास आपल्या अद्भुत लेखनाने आणि ओजस्वी वाणीने जनमानसात रुजवला, आणि त्याद्वारे राष्ट्र व धर्म रक्षणाची अखंड ज्योत पेटवली. pic.twitter.com/4sTxOgo5BN
— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021
अमित शहा यांनी १९ डिसेंबरच्या रात्री दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवशाहिरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या कामाचा आढावाही या वेळी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला.