ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित न करण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन !

इक्बालसिंह चहल

मुंबई – मुंबईत नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे (कार्यक्रमांचे) आयोजन केले जाते. या कार्यक्रमात पुष्कळ गर्दी होते. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी धोकादायक ठरू शकते. म्हणून नाताळ आणि नववर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे.

सध्या कोरोना नियमावलीत सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. यामध्ये सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के, मोकळ्या जागेत क्षमतेच्या २५ टक्के, एक सहस्रपेक्षा अधिक उपस्थिती असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची अनुमती, लसीच्या दोन मात्रा, मास्क आणि सुरक्षित अंतर या कोरोनाच्या संदर्भातील अन्य नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे.