गुजरातमधील उद्यानांत महिला करतात नमाजपठण !

मुसलमान पुरुषाने उद्यानातच दिली अजान !

  • सार्वजनिक ठिकाणी हिंदूंनी धार्मिक कृती केली, तर पोलीस त्यांच्यावर अनुमती नसल्यावरून कारवाई करतात; मात्र अल्पसंख्यांकांनी असे काही केले, तर पोलीस आणि प्रशासन शेपूट घालतात ! – संपादक
  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशांवर कारवाई झाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • देशातील अनेक सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे रस्ते, मैदान, रेल्वे स्थानक, विमानतळ मंत्रालय आदी ठिकाणी लोकांना अडचण निर्माण करून विनाअनुमती नमाजपठण केले जाते, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हे ‘निधर्मी’ भारतात कसे चालते, याचे उत्तर निधर्मीवादी का देत नाहीत ? – संपादक

भरूच (गुजरात) – येथे एका उद्यानात बुरखा घातलेली मुसलमान महिला  नमाजपठण करत असल्याचे, तर दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये मुसलमान पुरुष लहान मुले खेळतात, त्या घसरगुंडीच्या वरच्या भागात उभा राहून ‘अजान’ (नमाजपठणासाठी बोलावणे) देत असल्याचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ‘लहान मुले आजूबाजूला खेळत असतांना महिला उद्यानातच खाली चादर अंथरून नमाजपठण चालू करते’, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. उद्यानात अन्य काही महिला व्यायाम करत आहेत. अन्य एका व्हिडिओमध्ये कर्णावतीच्या वस्त्रापूर तलाव उद्यानात काही मुसलमान महिला नमाजपठण करतांना दिसत आहेत.

भरूच येथील नमाजपठणाविषयी एका व्यक्तीने सांगितले की, गेल्या आठवड्यापासून काही मुसलमान महिलांनी येथे नमाजपठण चालू केले आहे. महिला येथे येऊन नमाजपठण करतात. जर त्यांच्यावर कारवाई केली, तर ‘आमच्यावर अन्याय होत आहे’, असा थयथयाट ते करतील.